मुंबई | आमदार गणेश नाईक यांनी अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव सुरु केली आहे. त्यांनी ठाण्यातील न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आज दुपारी 2 वाजता सुनावणी होणार आहे. नेरुळ पोलिसांनी नाईक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. नाईक यांच्या विरोधात एका महिलेला जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या गुह्याला 24 तास उलटत नाही तोच त्यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने या दोन्ही गुन्ह्यांच्या अटकपूर्व जामिनासाठी 2 अर्ज दाखल केले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार एका महिलेने गणेश नाईक यांच्यावर आरोप केले आहेत. महिलेने सांगितल्यानुसार, ते दोघे गेल्या 27 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. तसेच नाईक यांच्यापासून आपल्याला एक मुलगा झाला असून त्याचे वय पंधरा वर्ष आहे. नाईक यांनी त्या महिलेला ग्वाही दिली होती की, हा मुलगा पाच वर्षांचा झाल्यानंतर मुलाचा आणि त्याच्या आईचा आपण अधिकृतपणे स्वीकार करू. मात्र नंतर नाईक यांनी आपला शब्द पळाला नाही आणि त्या महिलेची फसवणूक केली. त्यानंतर नाईकांकडून फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने शारीरिक संबंध ठेवण्यास विरोध केला.
मात्र, नाईक यांनी आपल्यावर जबरदस्ती करून वारंवार अत्याचार केला, अशी तक्रार पीडित महिलेने नेरुळ पोलीस ठाण्यात केली. यानंतर पोलिसांनी नाईक यांच्या विरोधात शनिवारी रात्री बलात्काराचा गुन्हा दाखल केला.नाईक आणि त्यांचा मुलगा आता 15 वर्षांचा आहे, मात्र नाईक त्यांचे पितृत्व स्वीकार करण्यास नकार देत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. त्यामुळे या महिलेकडून आपल्या हक्काची मागणी होऊ लागल्यानंतर गणेश नाईक यांनी मार्च 2021 मध्ये तिला बेलापूर येथील सेक्टर-15 मधील आपल्या कार्यालयात बोलावून घेतले होते. त्यावेळी महिलेने नाईक यांना विनंती केली होती की, आपल्या मुलाला स्वीकारा. परंतु नाईक यांनी या महिलेवर रिव्हॉल्व्हर रोखून तिला ठार मारण्याची धमकी दिली.