मागच्या काही दिवसांपासून रेमेडेसिविर इंजेक्शनच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यात आघाडी सरकार आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरु झाल्या आहेत. त्यातच आम्ही ब्रूक फार्माकडून रेमडेसिविर इंजेक्शन्स विकत घेण्यासाठी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडून परवानगी घेतल्याचा दावा भाजपचे नेते सातत्याने करत होते. मात्र, डॉ. शिंगणे यांनी यावर आता भाष्य केले आहे.
या संदर्भात रात्री उशिरा डॉ शिंगणे यांनी ट्विट वरून व्हिडिओ शेअर करत आपली भूमिका मांडली आहे. भाजपने माझ्या नावाचा जो अपप्रचार करत आहे त्यानिमित्ताने हा खुलासा देत आहे. भाजप रेमडीसीविर विकित घेऊन मला देणार होते अशी उलट सुलट चर्चा समाज माध्यम व सोसिएल मीडिया वर सुरू असून ते सपशेल चुकीचं आहे. कुठल्याही पक्षाला रेमडीसीविर वैयक्तिक रित्या विकता येत नाही किंवा वाटता येत नाही ते त्यांना सरकारलाच द्यावे लागतील, असे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्ट केले.
पुढे ते आवळ्या व्हिडिओत म्हणतात की, भाजपमधील काही लोकांनी माझ्याशी संपर्क साधला होता. तुम्ही आमच्या सप्लायरकडून रेमडेसिविर इंजेक्शन्स खरेदी करावीत, असे त्यांनी मला सांगितले. आता ते मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असे संकेत सुद्धा त्यांनी दिले आहे.