कोल्हापूरचे माजी खासदार आणि भाजपा नेते धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा पुरून येथे पार पडला. पुण्यात रविवारी पार पडलेल्या या लग्नसोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी उसळी होती. त्यामुळे आता या लग्नसोहळ्याची चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहे.
या शाही लग्नसोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्राची मान्यवर उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले होते.
धनंजय महाडिक यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा पुण्यातील मगरपट्टा सिटीतल्या लक्ष्मी लॉन्स येथे काल पार पडला होता. याबाबत मंगल कार्यालयाच्या चालकाला नोटीस देऊन चौकशी केली जाणार आहे. कोरोनासंबंधी नवे नियम आजपासून लागू होणार असले तरी आधीच्या नियमावलीनुसार शंभर जणांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडण्याचे बंधन होते.
या शाही विवाह सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर अशा दिग्गजांनी हजेरी लावली होती. अनेक पाहुण्यांनी लग्नात मास्क नव्हते घातले. परंतु केवळ मंगल कार्यालयाच्या चालकाला नोटीस बजावली जाणार असून महाडिक किंवा अन्य कोणावर कारवाईचा अद्याप उल्लेख नाही.