पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसने भारतीय जनता पक्षाला पराभवाची धूर चारली आहे. त्यात तृणमूलने २०० पेक्षा अधिक जागा जाणून भाजपचा दणदणीत पराभव केला आहे, याच अर्श्वभूमीवर अनेकांनी ममता बॅनर्जी यांनी त्यांचे कौतुक केले आहे. तर अनेकांनी टीका केली आहे. त्यात आता सतत वादग्रस्त वक्तव्य करत चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणावत हिने थेट पश्चिम बंगालची तुलना काश्मीर बरोबर केली आहे.
बांग्लादेशी आणि रोहिंगे हे ममता यांची मोठी ताकद आहे. ज्या प्रकारची प्रवृत्ती समोर येत आहे त्यातून असे दिसून येत आहे की, तिथे हिंदूंची संख्या फार कमी आहे. आकड्यांनुसार बंगाली मुसलमान संपूर्ण भारतात सर्वात गरीब आणि वंचित आहेत, चांगले आहे आणखी एक काश्मीर तयार होत आहे’, असे म्हणून कंगनाने थेट काश्मीरशी तुलना केली आहे. सध्या तिच्या ट्विटवर अनेकांनी तिला धारेवर धरले आहे.
पुढे कंगनाने असे म्हटले आहे की, ‘२०१६ मध्ये भाजपने बंगालमध्ये ३ जागा जिंकल्या होत्या. आता NRC आणि CAA ची गरज आहे. बंगालमध्ये अंल्पसंख्यांक आता बहुसंख्यांक झाले आहेत. ज्या प्रकारे मोदी आणि अमित शहा यांनी उत्कटतेने आणि समर्पण पद्धतीने काम केले आहे त्यांचे हे काम कौतुकास्पद आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपने खूप जोर लावला होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या समवेत संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ ममता बॅनर्जी यांच्या विरोधात प्रचाराला उतरले होते. परंतु ममता बॅनर्जी यांनी जोरदारपणे या सर्वांचा सामना करत भाजपला अस्मान दाखवले.