भारतीय जनता पक्षाच्या आणखी एका नेत्याने स्वत:च्याच सरकारविरोधात पोस्ट केली आहे. विश्नोईंच्या पाटण विधानसभा मतदार संघातील नुन्सरचे विभागीय अध्यक्ष यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शिवराज चौहान सरकारवर जोरदार हल्लबोल केला आहे. नुन्सर मंडळाचे अध्यक्ष अजय पटेल यांनी शिवराज सिंह चौहान सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मध्यप्रदेशात भाजपा नेते आपलाच सरकारवर नाराज आहेत.
अजय पटेल यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, की ‘आमच्या मध्य प्रदेशातील बिनकामाचा मुख्यमंत्री. मी स्वतः मंडळ अध्यक्ष त्यांचा विरोध करतो, पुढे काहीही होवो. कारण, मी स्वतः माझ्या जवळच्या व्यक्तींना डोळ्यासमोर जीव गमावताना पाहिलं आहे. आदरणीय शिवराजसिंह चौहान, मी तुमच्या पक्षाचा नुन्सर येथील विभागीय अध्यक्ष बोलत आहे. मी माझ्या कुटुंबासाठी इंजेक्शनची व्यवस्था करू शकत नसल्यास, मी हे स्वतःच अपयश समजू की या सरकारचं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
या पसोटवरून मध्यप्रदेशातील भाजपा नेते सुद्धा आपल्या सरकारवर नाराज असल्याचे दिसून येत आहे. या पसोटमुळे काँग्रेस आता भाजपाला घेरण्याचा पूर्णपणे प्रयत्न करताना दिसून येणार आहे, काँग्रेसचे शहराध्यक्ष दिनेश यादव यांनी ही पोस्ट म्हणजे राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या मनातील गोष्ट असल्याचे म्हटले आहे.