पुणे | मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे मार्गदर्शक पुरुषोत्तम खेडेकर यांनी भविष्यातील राजकीय घडामोडींचे संकेत दिले असून आगामी निवडणुकीत संभाजी ब्रिगेडला भाजपा हादेखील एक युतीचा पर्याय असू शकतो असं त्यांनी म्हटलं आहे. मराठा सेवा संघाच्या ३२ व्या वर्धापन दिनानिमित्त पुरुषोत्तम खेडेकर यांनी लेख लिहून ही भूमिका मांडली.
पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा मार्ग या मासिकात केलेल्या पुढील राजकीय स्थितीचा उहापोह केला आहे. त्यात संभाजी ब्रिगेडला आगामी काळात भाजपासोबत युती करण्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पत्नी रेखा खेडेकर या भाजपाच्या आमदार होत्या. परंतु तेव्हाही खेडेकर यांनी सातत्याने भाजपा आणि आरएसएस’च्या विचारसरणीवर टीका करत होते. खेडेकर आणि भाजपा विरोध यांचे अनेक किस्से आहेत.
राजकारणात शिवसेना-काँग्रेस हे कट्टर विरोधी विचारसरणीचे पक्ष एकत्र येऊ शकतात मग इतरांना का येऊ नये? काँग्रेस-राष्ट्रवादी जर संभाजी ब्रिगेडला गृहित धरणार असेल आणि केवळ संभाजी ब्रिगेडच्या नावाचा स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी वापर करत असेल संभाजी ब्रिगेडला काही राजकीय तडजोडी करून वेगळा पर्याय शोधावा लागेल. किमान समान कार्यक्रमाप्रमाणे भाजपासोबत युती होऊ शकते असं संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी सांगितले आहे.