सर्वोच्च न्यायालयाने २००५ मध्ये दिलेल्या भोंग्यांसंदर्भातील निर्णयाची अंमलबजावणी व्हावी,हीच आमची पूर्वी पासूनची भूमिका आहे मात्र आमच्या सरकारच्या काळात भोंग्यांबाबत माध्यमांनी किंवा अन्य पक्षांनी मागणी केली नसल्याने त्याबाबत निर्णय घेतला गेला नसल्याचे भाजपचे नाशिक प्रभारी आमदार गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी सांगितले.
राणा यांनी नोंदविलेला आक्षेप हा खार पोलीस ठाण्यातील नसून सांताक्रूज पोलीस ठाण्यातील आहे. त्यामुळे त्यांच्या आराेपासंदर्भातील मुद्द्यांची तपासणी करायची असल्यास सांताक्रूज पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्याची गरज असल्याचे महाजन यांनी नमूद केेले.
भाजप नेत्यांवर ईडीची कारवाई होत नाही, हा आक्षेप चुकीचा असून ज्यांच्याबाबत आक्षेप आहे, त्यांच्याबाबत संबंधितांनी तक्रार दिल्यास ईडीकडून त्या आक्षेपांची शहानिशा करून नियमात असेल तर त्यांची चौकशी होईल, असेही महाजन यांनी नमूद केले. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.