नारायण राणे यांची जी मुलं आहेत ना खरं सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अशी मुलं कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत असाच प्रत्येक आई-बाप म्हणेन. अशी टीका एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केली होती.

आता या टीकेचा भाजपा नेते आणि माजी खासदार नितेश राणे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. भास्कर जाधव तुझी औकात आम्ही २०२४ ला दाखवतोच . कधी ५ मुलाना तरी कामाला लावलं का, की ५ रुग्णांना कधी उपचार दिले का…भर चौकात तू आमच्या समोर तरी उभा राहू शकतो का अशा शब्दांत निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांचा समाचार घेतला.
पुढे बोलताना राणे म्हणाले की, भास्कर जाधव तुज्या सारखे सतराशे साठ भास्कर जाधव जरी एकत्र झाले तरी राणेंच काही उखाडु शकत नाही. जास्त बोलत राहिलास तर तुझे रंग कसे उतरवायचे ते आम्हाला माहीत आहे अस म्हणत गंभीर इशारा देखील निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांना दिला.