राज्यात आजपासून दोन दिवस पावसाळी अधिवेशन सुरु झाले असून पहिलाच दिवशी विरोधक आणि आघाडी सरकारमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झालेली पाहायला मिळत आहे. त्यातच विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव आणि आमदार संजय कुटे यांच्यात धक्काबुक्की झाल्याची माहित समोर येत आहे.
तसेच धक्काबुक्की करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी सुनिल प्रभू यांच्याकडून करण्यात आली आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या ठरावाच्या निमित्ताने खटके उडाल्याने आमदार संजय कुटे आणि आमदार गिरीश महाजन हे तालिका अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत जाऊन घोषणाबाजी करत असल्याचे विधानसभेत दिसून आले होते.
मात्र हा पण हा ठराव संमत झाल्यानंतर विधानसभेचे कामकाज हे १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. कामकाज तहकूब झाल्यानंतर अध्यक्षांच्या चेंबरमध्ये संजय कुटे आणि भास्कर जाधव यांच्यात धक्काबुक्की झाल्याचे कळते. या धक्काबुक्कीच्या घटनेनंतरच आमदार सुनिल प्रभू यांनीही भाजप आमदारांवर कारवाईची मागणी केली. जोवर कारवाई होत नाही, तोवर सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही असे सुनिल प्रभू यांनी हरकतीचा मुद्दा घेत स्पष्ट केले.