मुंबई | पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळाले असुन यावर आता सत्ताधारी आणि विरोधक आपले मत मांडत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचे चित्र दिसून येत आहे अशातच यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपले मत मांडले आहेआज भाजपाला यश मिळाले असले तरी भाजपच्या यशात मायावतींचं योगदान आहे, तसेच पंजाबच्या जनतेनी भारतीय जनता पार्टीला अत्यंत वाईट पद्धतीने नाकारले आहे.
उदे बोलताना राऊत म्हणाले की, पंजाबमधील पराभावावर मार्गदर्शन करा. हार-जीत होत राहते, आम्हीही तुमच्या आनंदात सामिल आहोत. असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे सर्व मतदारसंघाचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये पाचपैकी चार राज्यात भाजपने सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. यावर संजय राऊत यांनी मत व्यक्त केले आहे.
तर दुसरीकडे मुंबई मनपा निवडणुकीवर भाष्य करणाऱ्या विरोधकांना टोला लागवताना राऊत म्हणाले की, गेले ५० वर्षे महानगरपालिका निवडणुक लढतोय. उत्तर प्रदेश, गोवा, यांरख्या निवडणुकांचा महापालिका निवडणुकांशी काहीही संबंध नाही, मुंबई पालिकेवर भगवा झेंडा कायम राहणार असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त करत विरोधकांना टोला लगावला आहे.
अत्यंत चुकीच्या पद्धतीने केंद्रीय यंत्रणा काम करतेय. एकाच पक्षातील एकाच आघाडीचे लोकं टार्गेट केले जात आहेत. केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या दवाबाखालीच काम करतेयं. या मतीसी महाविकास आघाडी काम करतेय पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र याबद्दल बोललं पाहिजे. हे मी बोलल्यानंतर माझ्या घरावर छापा पडला तर मी घाबरत नाही. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस यांना फक्त राजकीय कारणांसाठीच हल्ले होत आहेत. सत्य सांगण दबाव नाही, सत्य ऐकण्याची तुम्ही तयारी ठेवा.