नवी दिल्ली | : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य केलं. शिवसेना यूपीएत जाणार का यासंदर्भात २४ तासांची मुदत दिली होती १२ तास अजून शिल्लक आहेत, असही राऊत म्हणाले. मी पक्षाचा शिवसैनिक आहे, त्यामुळे इकडे बसून जे काय करतो ते त्यांच्या आदेशानं करत असतो.
तसेच पुढे बोलताना राऊत म्हणाले की, घडामोडी ज्या घडतात ज्यात आम्ही सहभागी होत असतो ती उद्धव ठाकरेंना देत असतो, असं संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरेंचं काय म्हणनं आहे ते सांगतिलचं ना, ते लवकरच तुमच्याशी संवाद साधतील. महाराष्ट्रात आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी, लहान घटक पक्ष यांच्या साथीनं सरकार चालवतो. हा मिनी यूपीएचा प्रयोग हा क्रांतिकारक आहे. देशात याची चर्चा सुरु आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
यावेळी राऊत यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेसंदर्भात विचारले असताना राऊत म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांना इतकं गांभीर्यानं का घेता? तम्ही देखील त्यांना गांभीर्यानं घेत जाऊ नका अन्यथा तुम्हाला त्रास होईल. माझी उत्तर ऐकून त्यांना त्रास होईल, त्यांच्या प्रकृतीच्या काळजीपोटी मी उत्तर देत नाही, असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची आहे. विरोधी पक्षाच्या काळजीपोटी मी उत्तर देत नाही, असं राऊत म्हणाले.