मुंबई | कलर्स मराठी वरील वादग्रस्त ठरत असलेल्या बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात स्नेहा वाघ हिची नुकतीच एक्झिट झाली आहे. २१ तारखेला रंगलेली ‘बिग बॉसची चावडी’ स्नेहा वाघसाठी शेवटची ठरली. प्रेक्षकांच्या मतांमुळे या घरातील स्पर्धक सेफ झोनमध्ये असतात. जर प्रेक्षकांना एखाद्या स्पर्धकाचा खेळ आवडला नाही तर ते त्या स्पर्धकाला घरातून बाहेर काढू शकतात. असंच काहीसं स्नेहाच्या बाबतीत झालं आहे.
स्नेहा घरातून बाहेर पडली आहे. मात्र, जनमतामुळे नाही तर घरातील एका व्यक्तीमुळे स्नेहाला बाहेर पडावं लागलं असं मत विकास आणि विशालचं आहे.
आज बिग बॉसच्या घरात विकास आणि विशाल स्नेहाच्या घराबाहेर जाण्याविषयी चर्चा करणार आहेत. यात जयमुळे स्नेहाला नॉमिनेट व्हावं लागलं आणि त्याच्यामुळेच ती घराबाहेर गेली असं मत या दोघांचं आहे.
“मला वाटलं होतं जय खूपच हर्ट होईल. बेस्ट बॉन्ड बनून वगैरे होते मी बघितलं. म्हणजे स्नेहाकडून तरी तसं दिसत होतं. स्नेहा कितीतरी वेळा माझ्याशी जयविषयी बोलली आहे. मुख्यत: नॉमिनेशन झाल्यापासून, की जयला किती वाईट वाटेल त्यांच्या कॅप्टन्सीसाठी मी झाले. अणि, त्यांच्यामुळे घरी जाणार… समजा मी गेलेच तर. त्या जेवढा विचार करत होत्या ना, कशी हालत होईल जयची आणि सगळं… जाताना पण त्यांनी मला खुणावलं सांभाळा त्यांना अशा पध्दतीने. कशाला सांभाळा आणि सगळं?”, असं विशाल म्हणाला.