महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसत्तेला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्धवेर भाष्य करत शिवसेनाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. यावरी त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर भाष्य केले होते. भारतातील निवडणुका प्रतिकांवर होत असतात. जनतेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना बघून शिवसेनेला तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना बघून भाजपला सत्ता दिली, असं राज ठाकरे यांनी सांगितलं
यावेळी राज ठाकरे यांनी देशातील निवडणूक आणि नागरिकांच्या मानसिकेतेवर भाष्य केलं. मनसे आहे म्हणून राज ठाकरे आहे. माझं तोंड आणि माझ्या सहकार्यांचं काम आहे. पक्ष म्हणून नेता ओळखला जातो. एक राजकीय पक्षाचा नेता म्हणून बघितलं जातं. भारतात निवडणुका प्रतिकांवर होत असतात. लोकांनी मोदींना पाहून मतदान केलं. तर बाळासाहेबांना पाहून सत्ता दिली, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. देशात जो लाट निर्माण करतो तो जिंकतो. तसंच झालं. सध्या कोरोनाच्या लाटेवर सगळे स्वार आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.
यावेळी त्यांनी कोरोनाच्या परिस्थितीवर निवडणुकीवर भाष्य केले आहे. कोरोना आजार आहे, पण मानसिक आजार आहे. आताच्या परिस्थितीत निवडणुकीचा विचार नको. लोकांची मानसिकता निवडणुका घेण्याची नाही. समाज राहिला तर निवडणुका घेण्यात अर्थ आहे. समाजाचं मन स्थिर होणं महत्वाचं आहे, हा समाज स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न करायला हवेत. नेत्यांनी समाज स्थिरस्थावर करण्यावर भर द्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं.