मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याची भुमिका घेतली आहे. त्या भूमिकेचा आम्ही निषेध व्यक्त करीत असून एक मे रोजी औरंगाबाद येथील राज ठाकरे यांच्या सभेत आम्ही काळे झेंडे दाखविणार असल्याचा इशारा सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाकडून देण्यात आला आहे.
आज पुण्यामधील पत्रकार परिषदेत अशोकराव जाधव,अजहर तांबोळी आणि ताज सिद्दीकी यांनी भूमिका स्पष्ट केली आता सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या या भूमिकेमुळे मनसे आणि या पक्षात वाद होण्याचे चिन्ह दिसून येत आहे.
मुस्लिम समाजाला आजपर्यंत प्रत्येक वेळी आरोपीच्या पिंजऱ्यात बघितले आहे, हे अनेक घटनांमधून समोर आले आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगा काढले नाही तर आम्ही तिथे हनुमान चालीसा लावून असे विधान केले. त्याही पुढे जाऊन आम्हाला तीन तारखेपर्यंत मुदत दिली आहे. हे आम्हाला मान्य नसून राज ठाकरे यांचे विधान दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहेत.
तसेच राज ठाकरे यांच्या पाठीमागून भाजपा ही खेळी खेळत असून राज ठाकरे हे भाजपाचे अनाधिकृत भोंगा आहे. त्यामुळे त्यांनी यावर बोलूच नये. पण आम्ही या विरोधात सनदशीर मार्गाने उत्तर देऊ, असं डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने सांगितलंय