महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीनं धाड टाकली आहे. एवढंच नाहीतर त्यांच्या निकटवर्तींयांवरही ईडीकडून धाडी टाकण्यात आल्या आहेत.दापोली रिसॉर्ट संदर्भातील कथित जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अनिल परबांवर कारवाई केल्याचं बोललं जात आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परबांवर तोफ डागत हा कथित घोटाळा उघडकीस आणल्याचा दावा केला होता. अनिल परब यांनी लॉकडाऊन काळात शेतजमिनीवर रिसॉर्टचं बांधकाम करून फसवणूक केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. यावेळी सोमय्यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, 25 कोटींचा रिसॉर्ट अनिल परब यांचा आहे, उद्धव ठाकरे यांनी 19 बंगल्याचं नाटक केलं, आता परब नाटक करत आहेत, यांना नोबेल मिळालं पाहिजे. असा #@# मुख्यमंत्री राज्यांनी पहिला नाही. अनिल परब आता सुटणार नाहीत, त्यांना जेलमध्ये जावं लागणार आहे. हा पैसा वाझेचा आहे की खरमाटेचा आहे हा सवाल आहे.
आता यशवंत जाधव यांची सुरुवात झाली, काल प्रधान डीलर या विरोधात कंपनी मंत्रालयाने चौकशी सुरू केली आहे, त्यांच्या पूर्ण परिवार विरोधात कारवाई सुरू झाली आहे. त्यांनतर उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांचा नंबर लागणार आहे. काल परब म्हणाले तो मी नव्हेच, पळशीकर यांच्या एवजी या नाटकात अनिल परब असते, परब म्हणत आहेत, तो मी नव्हेच. काल ईडीचे लोक कशासाठी आले हे मला माहीत नाही.17 डिसेंबर 2020 मध्ये मुरुड येथील ग्रामपंचायत पावती आहे, ज्यात रिसॉर्टची पावती भरली आहे. घरपट्टी, property tax भरला. जर कदम यांचं घर आहे तर परब यांनी tax का भरला? असा सवाल सोमय्यांनी केला.