नवी दिल्ली | कर्नाटकमध्ये सुरू झालेला हिजाब प्रकरण आता वेगवेगळ्या राजकीय पक्षानेही उडी घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा म्हणाल्या आहेत की, महिलांनी कोणते कपडे घालावे आणि कोणते नाही, हे ठरवण्याचा अधिकार कोणालाच नाही. लखनौमध्ये एक आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्या म्हणाल्या
पुढे पिर्यान्क गांधी म्हणाल्या की, ‘ महिलांनी बिकिनी घालावी, हिजाब घालावा, साडी घालावी किंवा जीन्स घालावी हे ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे त्यांचा आहे. यामध्ये कोणतेही राजकारण नाही आणि नसावे.महिलांनी काय घालावं हा सांगण्याचा अधिकार कोणालाच नाही असे रोखठोक मत प्रियांका गांधी यांनी मांडले होते.
संबंधित त्यांना प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला त्या म्हणाल्या की, मी तुम्हाला म्हणते की तुम्ही तुमचा स्कार्फ काढा. यावर ते पत्रकार म्हणाले की, मी पत्रकार परिषदेत आहे, शाळेत नाही. यावरून प्रियंका गांधी म्हणाल्या की, मला तुम्हाला स्कार्फ काढा, सांगण्याचा कोणताही अधिकार नाही. त्याच प्रमाणे महिलांनी काय घालावे हे सांगण्याचा अधिकार ही कोणालाच नाही.