सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य अंत्रणेबरोबर दिवसरात्र मुंबई पोलीस आपली कामगिरी चोख बजावताना दिसून आले आहेत. तसेच कोरोनाच्या संसर्गामध्ये अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य बजावताना आपला प्राणही गमवावा लागला होता. मात्र दुसरीकडे आपले कर्तव्य चोख बजावणाऱ्या मुंबई पोलिसांची थट्टाच ठाकरे सरकारने केली आहे. राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना भरघोस दिवाळी भेट दिल्याचं पहायला मिळत आहे. पण सरकारने पोलिसांची चेष्टा केल्याचं पहायला मिळत आहे.
दिवाळीच्या काळात नाही तर सर्व सणांमध्ये शहरात कायद्या आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तसेच आपलं कर्तृत्व चोखपणे पार पाडणाऱ्या मुंबई पोलिसांना राज्य सरकारने मात्र केवळ ७५० रूपये भेट जाहीर केली आहे. राज्यातील अन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या रक्कमेची दिवाळी भेट जाहीर केली आहे. पण पोलिसांना मात्र तुटपूंजी मदत जाहीर केली आहे. यामुळे पोलिसांमध्ये नाराजीचं वातावरण पहायला मिळत आहे.
मुंबई पोलिसांना दिवाळी भेटीच्या निमित्ताने सबसिडी कँटिनमध्ये त्याच्या नावे डेबिट आणि क्रेडिट कार्डवर ७५० रूपये इतक्या शुल्लक रक्कमेची खरेदी विनामुल्य करता येणार आहे. ही भेट पोलिसांसाठी असणाऱ्या संचित निधीमधून करण्यात येणार आहे. त्यामुळे आता या निर्णयावर अनेकजण नाराज असल्याचं दिसून येतंय. यावर आता विरोधक काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.