मुंबई : माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर लगावलेल्या १०० कोटीच्या हप्ता वसूलीच्या प्रकरणात कोर्टाने सीबीआयला या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. या सर्व प्रकरणात नैतिकता स्वीकारून देशमुखांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता हाच धागा पकडत अभिनेत्री कंगना राणावत हिने ट्विट करून अनिल देशमुखांना टोला लगावला आहे.
कंगनाने आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, पालघर येथे २०२० मध्ये साधू मॉब लिचींग आणि स्त्रियांचा अपमान करणाऱ्यांचं येथे राहण्याचा काहीही अधिकार नाही. #AnilDesmukh ही तर फक्त सुरुवात आहे पुढे बघा होत काय #UddhavThackeray असं ट्विट करत तिने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाकडे अॅड. जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये मंगळवारी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआयमार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत. त्यानुषंगाने मला गृहमंत्री पदावर राहणे नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, म्हणून मी स्वत:हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे. मला गृहमंत्री या पदावरुन कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंती, असे राजीनामा पत्र अनिल देशमुख यांनी ट्विटरवर शेअर केले होते.