मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागूपर आणि मुंबईतील निवासस्थानावर ईडीने छापा टाकला असून गेल्या चार तासांपासून चौकशी सुरू आहे. अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानाबाहेर यावेळी केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांना अर्थात सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आलं आहे.
या कारवाईवर आता बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य करत केंद्रीय संस्थेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर संताप व्यक्त केला आहे. देशातील यंत्रणांचा इतक्या प्रमाणात गैरवापर होताना कधीही पाहिलं नव्हतं, असा गंभीर आरोप सुप्रिया सुळेंनी सत्ताधारी भाजपवर केला आहे. केंद्रिय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीनं वापर केला जात आहे. ईडीची कारवाई राजकीय सूडापोटी केली जाते हे स्पष्ट दिसतंय असे विड्न करत केंद्रावर घणाघाती टीका त्यांनी केली होरी.
अनिल देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या गुन्हाच्या अनुषंगाने ईसीआयर दाखल करत ईडीने तपास सुरु केला होता. ईडीने आज सकाळी देशमुखांच्या नागपुरातील घरी छापेमारी केली. यावेळी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सीआरपीएफचे जवान मोठ्या प्रमाणात हजर होते. मात्र यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनोंदलं करून या कारवाईचा निषेध नोंदवला होता.