मुंबई | शिवसेना नेत्या दीपाली सय्यद ह्या मागच्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना दिसून येत आहे अशातच आता दीपाली सय्यद यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.
मुंबई पोलिसांनी तुरूंगात दिलेल्या अमानुष वागणुकीविरोधात खासदार नवनीत राणा यांनी संसदीय अधिकार समितीसमोर हजेरी लावली. तत्पूर्वी प्रसार माध्यमांशी बोलताना नवनीत राणांनी मुंबई पोलिसांना थेट इशारा दिला होता. यावरून दीपाली सय्यद यांनी नवनीत राणांवर टीका केली आहे. त्यामुळे दिपाली सय्यद हिने आपला मोर्चा आता नवनीत राणा ह्यांच्याकडे वळवला आहे.
नवनीत राणांचा अमरावतीची भाकरवडी असा उल्लेख करत दीपाली सय्यद यांनी तुफान टोलेबाजी केली आहे. मुंबई पोलिसांना हाकलून लावण्याची भाषा केलीस तु तुझ्या घरी. त्याच पोलिसांनी चौकीत खाऊ घातली चाय बटर खारी, असा टोला दीपाली सय्यद यांनी लगावला आहे. दरम्यान, पोलिसांचे नाव खराब करण्याचा प्रयत्न केलास जरी. आम्ही तक्रार करून उभं करू तुला गृहमंत्र्यांच्या दारी, असा इशारा देखी दीपाली सय्यद यांनी दिला आहे.