महानायक अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात. या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती देखील मिळते. नुकतीच अमिताभ यांनी सोशल मीडियावर सुप्रभात अशी पोस्ट शेअर केली. या पोस्टला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी अमिताभ यांना ट्रोल केलं. या ट्रोलर्सला बिग बींनी हटके स्टाईलनं उत्तर दिलं.
अमिताभ बच्चन यांनी ‘सुप्रभात’ असं लिहिलेली पोस्ट शेअर केली. या पोस्टला कमेंट करुन एका नेटकऱ्यांनी अमिताभ यांना ट्रोल केलं. त्या नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘अबे बुढ्ढे दोपहर हो गयी’ नेटकऱ्याच्या या पोस्टला बिग बींनी रिप्लाय दिला, ‘मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो की, तुमचे वय वाढल्यानंतर तुम्हाला कोणीही म्हातारा म्हणू नये.’
तर नेटकऱ्यानं बिग बींच्या पोस्टला कमेंट केली, ‘तुम्हाला असं नाही वाटत का की खूप लवकरच तुम्ही सुप्रभात ही पोस्ट शेअर केली.’ यावर बिग बी म्हणाले, ‘तुम्ही मारलेल्या टोमण्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. पण मी रात्री उशिरापर्यंत शूटिंग करत होतो. त्यामुळे सुप्रभात करायला उशिर झाला. मी त्यामुळे तुमची माफी मागतो.एक नेटकरी म्हणाला, ‘असं वाटतं आहे तुमचे SUMMER HOLIDAYS सुरू झाले आहेत त्यामुळे तुम्ही उशिरा उठला.’ यावर अमिताभ म्हणाले, ‘नाही, मी रात्री काम करत होतो. त्यामुळे उशिरा उठलो असे प्रतिउत्तर दिले.