जळगाव | राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी एकाच टीकेला सुरवात केली असून आता त्यापाठोपाठ भाजपा खासदार रक्षा खडसे यांनी सुद्धा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे रावेरच्या भाजप खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलत असतांना रक्षा यांनी राज्यभरात घडणाऱ्या विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
यावेळी बोलत असतांना रक्षा खडसे म्हणाल्या की,’राज्य सरकारला जेव्हा टॅक्स कमी करण्याची वेळ येते तेव्हा जनतेचा विचार न करता वाईनला परवानगी दिली जाते. जर खरंच जनतेविषयी महाविकास आघाडी सरकारला चिंता आहे तर जसे केंद्र सरकार एक पाऊल मागे घेतले तसेच राज्य सरकारने घेऊन टॅक्स कमी करावा’, असेही रक्षा म्हणाल्या.
पुढे खासदार खडसे म्हणाल्या की, ‘कर कमी न करता कोरोनाच्या काळातही वाईन ला परवानगी देण्यात येते हे अत्यंत चुकीचे आहे. राज्यात दारूबंदीसाठी महिला आंदोलन करत आहे परंतु राज्य सरकार दारू विक्रीला परवानगी देत असेल तर हे चुकीचे आहे’, असेही त्या म्हणाल्या.