(मुंबई प्रतिनिधी ) राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यात सामान्य नागरिकांबरोबर सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. याच पार्श्वभूमीवर आता आमदार नितेश राणें यांनी खोचक सवाल उपस्थित केला आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे गेल्या दीड वर्षात राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरत होते. त्यांना आतापर्यंत कधीही कोरोना झाला नाही. त्यांना अधिवेशनाला आठ दिवस शिल्लक असतानाच कोरोना झाला. नेमका सकाळीच छगन भुजबळांनाही झाला.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेदेखील कुटुंबासोबत संवाद यात्रेसाठी राज्यभर फिरत आहेत. त्यांना आतापर्यंत कोरोना झाला नव्हता, तोही काही दिवसांपूर्वी झाला. म्हणून हा एक वेगळ्या प्रकारचा कोरोना महाराष्ट्रात आला नाही ना असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आहे, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.