कोल्हापूर | राज्यात विरोधक एकीकडे महाविकास आघाडीवर टीका करून अडचणी वाढवत असताना आता दुसरीकडे मित्र पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जोरदार धक्का दिला आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीमधून बाहरे पडण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. दरम्यान, मविआ आणि आमचा मार्ग वेगळा असल्याचा निर्णय राजू शेट्टी यांनी घेतला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक कोल्हापूरात पार पडली. या बैठकीत राजू शेट्टी यांनी मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. राजू शेट्टी यांनी मविआसोबत न राहण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अखेर आज स्वाभिमानी पक्ष मेळाव्यात राजू शेट्टींनी निर्यण जाहीर केला आहे.
राजू शेट्टी म्हणाले, आजपासून मी मविआसोबत असलेले सर्व संबंध संपल्याचे जाहीर करतो. आजवर दिल्लीवाल्यांनी फसवले, आता मुंबईवाल्यांनी फसवले. त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊ आणि स्वत:च्या मनगटाच्या बळावर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ, असे राजू शेट्टी म्हणाले आहेत. तसेच तडफडून मरण्यापेक्षा लडून मरणे केव्हाही चांगले, असेही ते म्हणाले.