राज्यात OBC आरक्षणाचा मुद्धा तापत असताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडताना दिसत आहे. त्यातच OBC च्या राजकीय आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या अध्यादेशावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुर झाल्या आहेत. हा आदेश काढल्यानंतर म्हणजे सरकारला उशिरा सूचलेले शहाणपण असल्याची टीका विरोधी पक्ष नते देवेंद्र फडणवीस यांनी केली. या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
आमचं सरकार सर्वांना सोबत नेणारं सरकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन्ही विरोधी पक्षनेते आणि सर्व पक्षांना एकत्र घेऊन बैठक घेतली त्यात चर्चा झाली होती. ओबीसी आरक्षण प्रश्न निकालात निघत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये. पण निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या. त्यामुळे काल सरकारने एकमताने निर्णय घेतला अध्यादेश काढून पुढे जायचे ठरले आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
विरोधकांनी यावर टीका केली, उशीरा सुचलेले शहाणपण, त्यांनी अधिकार आहे टीका करण्याचा. पण सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचं ठरलं आहे. अध्यादेश तातडीने काढण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोग स्वायत्त आहे, असे ते म्हणाले. आपले ५२ टक्के आरक्षण आहे. आदिवासी बहुल जिल्ह्यात ओबीसींना जागा राहत नाही. तो अन्याय दुसरीकडे भरून काढला पाहिजे अशी चर्चा काल मंत्रीमंडळ बैठकीत झाली. त्यातून मार्ग काढला आहे