पुणे | नवाब मलिक यांना अटक होताच राज्यातील राजकीय वातावरण चनळेच तापू लागले होते. तसेच विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडी आणि नवाब मलिकांवर गंभीर आरोप करून गेले. अंडरवर्ल्डशी संबध असणाऱ्यांना वाचवणे अतिशय निदनिय आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. आता नवाब मलिक यांच्या मुलीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांनी सांगितले की, वडिलांना भेटून पुन्हा लढण्याची हिम्मत आली आहे. आम्ही आधीही लढलो आणि पुढेही लढणार आहोत. तसेच, त्यांनी आधीही सांगितले होते ते आणखीन फर्जीवाडे उघड करणार आहेत. आरोप केल्यामुळे सत्य लपून राहत नाही. आता सुरू झालेली लढाई ही राजकीय आहे. आरोप करणारे लोक पुरावे देत नाहीत. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. त्यानुसार, आम्ही आधीही लढलो आणि पुढेही लढणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
बुधवारी मालिकांच्या अटकेचे वृत्त समजताच तणावात भर पडली. नवाब मलिक यांना वैद्यकीय तपासणीसाठी बाहेर आणताच, हसतच हम लढेंगे म्हणत वाहनातून बाहेर पडले. कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी वाढली. पोलीस उपायुक्त डॉ. हरी बालाजी यांनी स्वतः हजर राहून परिस्थिती नियंत्रणात आणत, कार्यकर्त्यांना समजावून माघारी पाठवण्याचा प्रयत्न केला. मलिक यांना न्यायालयात आणताच तेथे त्यांचे कुटुंबीयही हजर होते. यावेळी न्यायालयाच्या आवारात त्यांच्या मुलीला अश्रू अनावर झाले होते.