पुणे | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ मंत्री अनिल परब आणि खासदार भावना गवळी यांना ईडीने नोटीसा बजावल्या अहंतेत. तसेच अनिल परब यांना चौकशीसाठी हजर राहंण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिय सुळे यांनी थेट केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधत घणाघाती टीका केली होती. त्यावरुनच आता सुप्रिया सुळे यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे.
त्यांनी नागपुरात बोलताना शिवसेनेसह महाविकास आघाडीतील पक्षांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. चंद्रकांत पाटील सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना म्हणाले, महाविकास आघाडी सरकार मधील लोकांना ईडीचा फायदा होणार असेल वाटत असेल तर त्यांनी पेढे वाटावे. सुप्रिया सुळे यांना असे वाटत असेल की सत्तेचा गैरवापर या आधी एवढा कधीच झाला नाही, तर त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारावे की सत्तेचा गैरवापर इंदिरा गांधी यांनी कसा केला.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संभाव्य लाटेच्या धोक्यातही लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी यात्रा काढणे चालूच आहे, जनतेचा जीव धोक्यात घालत असल्याची अप्रत्यक्ष टीका केली. पाटील त्याला प्रत्युत्तर देताना म्हणाले, जन आशीर्वाद यात्रेवर मुख्यमंत्री काहीही बोलू शकतात, कोकणात जन आशीर्वाद यात्रेला प्रतिसाद मिळाल्यामुळे त्यांना याची दखल घ्यावी लागली.