सध्या संपूर्ण देशभरत कोरोनाच्या संसर्गाला रोखनसाठी युद्ध पातळीवर लसीकरण मोहिमेला सुरवात झाली आहे. त्यातच सतत वादग्रस्त वक्तव्य करत नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणावत हिच्या लस घेण्याच्या मुद्द्यावरून आता तिचा खोटा पण उघड झाला आहे. नुकताच कंगनाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत ती लसीकरणाबद्दल जनजागृती करताना दिसून येत आहे.
या व्हिडीओत कंगना म्हणते की, ‘कोरोनामुळे बरेच लोक निगेटिव्ह फील करत आहेत. मात्र, ही वेळ निगेटिव्ह विचार करण्याची नाही, तर लस घेऊन पॉझिटिव्ह राहण्याची आहे.’ या व्हिडिओत कंगना लसीकरणाचे फायदे सुद्धा सांगितले आहे. तसेच कुटुंबातील लोकांना लसीकरणाचं महत्त्व पटवून देत सर्वांचं लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन केलं असून लवकरच लस घेणार असल्याचं तिनं सांगितलं आहे. मात्र यावेळी एका नेटकऱ्याने ‘रजिस्ट्रेशन सुरू झालं नाही, तरी रजिस्ट्रेशन कसं केले, दीदी रजिस्ट्रेशन केल्याचं खोटं सांगते आहे असे त्याने बोलून दाखविले आहे.
या व्हिडीओत कंगनानं भारताला जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश म्हटलंय. यावरून तिला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं जातंय. तसंच लशीला औषध म्हटलं असून कोरोनाचा प्रसार व्हायला लोकसंख्या कारणीभूत आहे, असं म्हटलंय. त्यामुळे नेटकऱ्यांनी कंगनावर टीका केली आहे. काही युजर्सनं तिला विचारलंय की, ‘लोकसंख्या कोरोना वाढीस कारणीभूत आहे, तर मग त्यांनी कुंभ मेळा आणि राजकीय रॅलीचे व्हिडीओ का शेअर केले नाहीत.’
