तामिळनाडू विधानसभा निवडणुकीला मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया वापरल्या जात आहेत. मात्र ती वापरत असताना भाजपा नेते आता तोंडावर आपटताना दिसून येत आहेत. अशीच काहीशी फजिती भाजप नेत्यांची तामिळनाडूत झाली आहे.
झाले असे की, प्रचारादरम्यान भाजप नेत्यांनी चक्क काँग्रेस नेत्याच्या सुनेची डान्स क्लीपच वापरली आहे. तामिळनाडूत भाजपच्या नेत्यांनी केलेल्या या प्रतापामुळे भाजपचे नेते, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. भाजप नेत्यांच्या या प्रतापामुळे तामिळनाडूत एकच खळबळ उडाली आहे.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने प्रचाराच्या या रणधुमाळीत भाजप आणि काँग्रेसचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र, आता तामिळनाडूतील भाजप नेत्यांमुळे भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर तोंडघशी पडण्याची वेळ ओढावली आहे.
तामिळनाडूतील भाजप नेत्यांमुळे भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर तोंडघशी पडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. श्रीनिधी चिदंबरम यांनी २०१० साली जागतिक तामिळ परिषदेच्यावेळी हे नृत्य सादर केले होते. सेमोझी गाण्यावर त्यांनी हे सादरीकरण केले होते. मात्र, भाजपने हा व्हीडिओ कोणाचा आहे, याची खातरजमा न करता तो बिनधास्त आपल्या निवडणूक प्रचारासाठी वापरला.
त्यानंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी तयार केलेल्या व्हीडिओमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांची सून श्रीनिधी चिदंबरम यांच्या डान्सची क्लीप वापरल्याचे समोर आले. ही बाब काहींच्या लक्षात आल्यानंतर अनेकांनी भाजपला ट्रोल केले. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी सोशल मीडियावरून हा व्हीडिओ तात्काळ डिलीट केला.