राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी काल मध्यरात्री पार पडली असून त्यात भाजपच्या तीन उमेदवारांचा विजय झाला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला असून त्यांचे प्रत्येकी ३ उमेदवार निवडून आले आहेत. दरम्यान, भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक हे निवडणुकीत विजयी झाले आहेत. दरम्यान, या विजयानंतर संभाजीराजेंच्या समर्थकांनी शिवसेनेला चिमटा काढला आहे.
“शिवसेनेचे गर्वाचे घर खाली. वाचाळवीर संजय राऊत आता कसं वाटतंय गार गार वाटतंय”, अशा शब्दात माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांनी राज्यसभा निवडणुकीच्या निकालावरून शिवसेनेला टीकेचे लक्ष्य केले आहे. “पक्षाच्या नावात शिव वापरुन रॉयल्टी खाल्लीत, आता शिवसेनेला शिवाजी महाराजांच्या नावाची रॉयल्टी खाऊ देणार नाही”, असा इशारा छावा प्रमुख धनंजय जाधव यांनी दिला आहे.

निकालाचा हा संदर्भ घेऊन संभाजी राजे समर्थक छावा प्रमुख धनंजय जाधव यांनी ट्विटर वर यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यात म्हटले आहे की, “शिवसेनेचे गर्वाचे घर खाली. संजय राऊत आता कसं वाटतयं. गार गार वाटतयं. संभाजीराजेंना शिवबंधन बांधायला सांगणारे मागील ३० वर्षांपासून शिवबंधन बांधलेल्या कार्यकर्त्याला निवडून आणू शकलेले नाहीत.