नागपूर | राज्यातील वातावरण सध्या विविध मुद्द्यावरून तापले असून विरोधकांनी थेट आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे मागणी केली आहे अशातच आता विरोधकांच्या या मागणीला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे. महाराष्ट्रात शिवसेनेला आव्हान देण्यासाठी सात जन्म घ्यावे लागतील. शिवसैनिक आता गप्प बसणार नाहीत, असं म्हण तसंजय राऊत यांनी राणा दाम्पत्यांवर हल्लाबोल केला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, “कुणाच्यातरी पाठबळात तुम्ही आमच्या मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न करत असाल, मुंबईत येऊन, तर शिवसैनिक काय स्वस्थ बसतील का? कायदा आणि सुव्यवस्थेच्या गोष्टी आम्हाला सांगू नका. कायदा आणि सुव्यवस्था काय आहे? आणि सरकारनं, मुख्यमंत्र्यांनी काय केलं पाहिजे? हे सल्ले तुमच्याकडून ऐकून अंमलबजावणी करण्या इतपत महाराष्ट्राला भिकारीपण आलेलं नाही.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, तुम्ही आमच्या मातोश्रीत घुसताय, हिंमत नाही घुसण्याची पण बदनाम करताय, कोण तुम्ही ? तुम्ही कोण आहात? तुम्ही तुमच्या लायकीप्रमाणे राहा, तुम्ही जर तुमची लक्ष्मणरेषा ओलांडली, तर मग शिवसैनिकांनाही चिडून तुमच्या घरापर्यंत घुसण्याचा अधिकार आहे.” तसेच आम्हाला धमक्या देऊ नका. राष्ट्रपती राजवट लागेल, केंद्रीय तपास यंत्रणा येतील, या धमक्या देऊ नका. हिंमत असेल तर सीबीआय लावा, ईडी लावा. आम्हाला त्रास द्या. आम्ही तुम्हाला घाबरत नाही.