काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याच्या मुद्द्यावरुन घणाघाती टीका केली होती तसेच राज्य सरकारला इशारा सुद्धा दिला होता या आंदोलनानंतर काही प्रमाणात मशिदीवरील भोंग्याचे आवाज काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले होते मात्र अद्याप काही ठिकाणी या आंदोलनाचा परिणाम झाल्याचे चित्र दिसून आलेले नाहीये तसेच औरंगाबाद शहरातील सातारा परिसरातील पहाटेची अजान बंद होत नसल्याने मनसेने थेट पोलीस ठाण्यासमोरच सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
सातारा परिसरातातील मशीदीवर सकाळी 6 वाजेच्या आधी मोठ्या आवाजात अजान दिली जाते. त्यामुळे ही अजान बंद करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन मनसे नेते महाजन यांनी काही दिवसांपूर्वी सातारा पोलीस ठाण्यात दिले होते. मात्र त्यांनतर कोणतेही कारवाई झाली नसल्याचा आरोप महाजन यांनी केला आहे. याबाबत सातारा पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना अनेकदा मॅसेज करूनही प्रतिसाद मिळत नाही. तसेच भेटीची वेळ मागीतीली मात्र तेही देण्यात आली नसल्याचा आरोप महाजन यांनी केला आहे.
यावेळी बोलताना महाजन म्हणाले की, निवदेन देऊनही पोलिसांकडून कोणतेही कारवाई केली जात नाही. त्यामुळे आता सातारा पोलीस ठाण्याच्या समोरच मी सत्याग्रह आंदोलन करणार आहे. आज मुंबईला निघालो असून, तेथून आल्यावर लवकरच आंदोलनाची तारीख जाहीर करणार असल्याचं महाजन म्हणाले त्यामुळे पुन्हा एकदा औरंगाबादेत भोंग्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेले दिसून येणार आहे.