मुंबई | गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देताना अभिनेता शाहरुख खानने केलेल्या एका कृतीवरून सर्वत्र चर्चा सुरू आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला शाहरुख खानचा फोटो व व्हिडिओ चांगलाच ट्रोल होताना दिसतोय. यावरच आता विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेत्री व शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
लता दिदींच्या पार्थिवावर शाहरूख थुंकला नाही, तर त्यानं दुआ फुंकली. असे वक्तव्य करत उर्मिला मातोंडकर यांनी संताप व्यक्त केला आहे. ट्रोल करणाऱ्यांना उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या भाषेत उत्तर दिलंय. समाज म्हणून आपण कुठे चाललोय? टीकाकारांनी काळ आणि वेळेचं भान जपायला हवं. अशा कडक शब्दात उर्मिला यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
लता मंगेशकर यांचं पार्थिव अंत्यसंस्कारांपूर्वी ते काही काळ दर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यादरम्यान दीदींना श्रद्धांजली तसंच फुलं, हार वाहण्यासाठी लोक रांगेत येत होते आणि चौथऱ्यावर चढून पार्थिवाजवळ येऊन आपली श्रद्धांजली वाहत होते. त्यावेळी शाहरुख खानने मास्क खाली केला आणि तो पुढे वाकला. त्यावेळी त्याने फुंकर मारली याचा फोटो सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतोय. यावरूनच तो थुंकला अशी टीका होत असल्यात या टीकेला उर्मिला मार्तोडकर हिने टीकारांना प्रतिउत्तर दिले आहे.