नवी दिल्ली | केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ मध्ये महिलांना विशेष स्थान देण्यात आले आहे. २०२२ च्या अर्थसंकल्पात महिलांसाठी तीन नवीन योजना सुरू करण्यात येणार असून, देशातील २ लाख अंगणवाडयांचा विस्तार करणयात येणार आहे.या अर्थसंकल्पात महिलांसाठी तीन नवीन योजना सुरू करण्यात येणार असून, देशातील २ लाख अंगणवाडयांचा विस्तार करणयात येणार आहे.
याविषयी बोलतांना अर्थमंत्री सीतारामण म्हणाल्या की, आमच्या सरकारने लाभ देण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या मिशन शक्ती, मिशन वात्सल्य, सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.० सारख्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या आहेत.
तसेच २ लाख अंगणवाड्या सक्षम अंगणवाड्यांमध्ये श्रेणीसुधारित केल्या जातील. अर्थमंत्री म्हणाल्या, महिला आणि बालकांच्या एकात्मिक विकासासाठी तीन योजना सुरू करण्यात आल्या आहेत. बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी दोन लाख अंगणवाड्या अधिक चांगल्या केल्या जाणार आहेत.