नवी दिल्ली | देशातील पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरूकेली आहे. अशात काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
देशाच्या राजकारणात सध्या भाजप आणि काॅंग्रेसमधील सत्तासंघर्ष प्रचंड गाजत आहे. गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यातील वातावरण पेटलं आहे. पाचपैकी सध्या चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. तर पंजाब या एकमेव राज्यात काॅंग्रेसची सत्ता आहे. अशातच भाजपच्या हातातून सत्ता हिसकावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
काही दिवसांपूर्वी काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंजाबचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी काॅंग्रेस नेत्यांसह विधानसभेच्या उमेदवारांना सोबत घेत सुवर्ण मंदिरास भेट दिली होती. या भेटीनंतर माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी अजब वक्तव्य केलं आहे. सुवर्ण मंदिरात राहुल गांधी यांचं पाकिट कोणी मारलं?, असा सवाल बादल यांनी केल्यानं राजकारण तापलं आहे.
चरणजीत सिंग चन्नी, काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू, पंजाबचे गृहमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा या तीन नेत्यांना राहुल गांधी जवळ जाण्याची परवानगी होती, असंही कौर म्हणाल्या आहेत.