मुंबई | एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद साऱ्या महाराष्ट्राने पाहिला. गेल्या महिन्याभरापासून हे प्रकरण थोडंसं शांत झालं असतानात आता या प्रकरणात एक ट्विट्स आला आहे. समीर वानखेडे यांनी नवाब मलिकांविरोधात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीनंतर आता आयोगाने पुढील ७ दिवसांच्या आत कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश महाराष्ट्र पोलिसांना दिले आहेत. या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी मलिकांना टोला लगावला.
समीर वानखेडेंनी आयोगात केलेल्या तक्रारीत नमूद केलं होतं की, नवाब मलिकांनी त्यांच्यावर मानसिक अत्याचार केले. त्यांच्या धर्माबाबात आणि जातीबाबत सातत्याने उल्लेख करत त्यांना त्रास दिला. त्यामुळे या तक्रारीनंतर आयोगाने नवाब मलिकांविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यावरूनच भाजपाने त्यांना टोला लगावला. “लवकरच तुरुंगात बसून पत्रकार परिषदा होतील असे दिसते…”, असा एका वाक्यात अतुल भातखळकर यांनी मलिकांना टोला लगावला.