मुंबई | राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. वाईन विक्रीच्या नव्या प्रस्तावाला गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. जे सुपर मार्केट १ हजार स्वेअर फुटांच्यावर आहेत तिथं एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला सरकारनं परवानगी दिली आहे. या संदर्भात विरोधकांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
शेलार ट्विटमध्ये म्हणाले की , ठाकरे सरकारचे मद्य प्रेम यापूर्वी वारंवार दिसून आले होतेच…आता किराणा मालाच्या दुकानात दारु विकण्याची परवानगी दिली आहे. पब, पेग, पार्टी आणि दारु याबाबत “अती संवेदनशील” असणाऱ्या ठाकरे सरकारने भविष्यात नळाव्दारे 24×7 घरोघरी दारु उपलब्ध करुन दिली तरी नवल वाटू नये, असा टोला शेलार यांनी सरकारला लगावला आहे.
दरम्यान राज्यातील सर्व किराणा दुकानांमध्ये वाईन उपल्बध करुन देण्याबाबतचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. राज्याचा महसूल वाढविण्याचा दृष्टीकोनातून हा निर्णय घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि मानती नवाब मलिक यांनी माध्यमांना दिली होती.