शक्ती कायद्याच्या संदर्भातील जे विधेयक ज्यॉईंट समितीकडे पाठवण्यात आलेलं होतं. त्याचं कामकाज पुर्ण झालेलं आहे. त्यामुळे आज विधानसभेत ज्यॉईंट कमिटीचा अहवाल आम्ही सादर करणार आहोत.त्यानंतर या आठवड्यात किंवा पुढील आठवड्यात शक्ती कायदा विधानसभेत मंजूर करण्यात येईल. असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील विधीमंडळाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, कायदा व सुवस्थावर जे काही प्रश्न असतील त्यावर विरोधक सुद्दा जरूर आक्रमक होतील. तसेच ते सुद्धा अनेक प्रश्न विचारतील. त्यामुळे विरोधकांना उत्तर देण्याची तयारी राज्य सरकारची आहे.
महाविकास आघाडीची बैठक आता थोड्याच वेळात होणार आहे. फ्लोअर मॅनेजमेंटच्या दृष्टीकोनातून सभागृहात अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात. त्यावर सरकारची भूमिका काय आहे?, प्रशासनाची भूमिका काय आहे?, यावर चर्चा करण्यात येणार आहे. कर्नाटकातील बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करण्यात आली होती. त्यावर वळसे पाटील म्हणाले की, आमच्या पक्षातील नेते निर्णय घेऊन पुढील पाऊल उचलणार आहेत. असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
दरम्यान, विधीमंडळात एसटी कर्मचाऱ्यांचा संप यावर अनेक प्रश्न विचारण्यात येतील असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पाटील म्हणाले की, सभागृहात विरोधकांचं आग्रही म्हणणं आणि त्यावर सरकारची भूमिका ही नेहमीच असते. तसेच ही काही नवीन नाही. मात्र, सामंजस्यांनी सर्व प्रश्न मार्गे लावू. असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.