मुंबई | मागच्या दोन महिन्यापासून सुरू असलेला एसटी कामगारांचा संप मागे घेण्याची घोषणा एसटी कर्मचारी वेतन संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी केल्यानंतर जेष्ठ वकील गुणारत्ने सदावर्ते यांनी मात्र संप सुरूच राहील अस म्हणत राज्य सरकार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वर टीका केली आहे. हे सर्व शरद पवारांचे गलिच्छ राजकारण आहे असा आरोप सदावर्ते यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांची काही माणसे अजय गुजर त्यांना प्रेशर करत होते. त्याचे काही सीसीटीव्ह फुटेज आमच्याकडे आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्यावर प्रेशर आणलं जात होतं. शरद पवारांसारखी माणसे अजय गुजर यांच्यासारखा माणसांवर प्रेशर आणू शकतात माझ्या सारख्या माणसावर नाही. अजय गुजर यांनी संपातून माघार घेण्यात शरद पवारांचे गलिच्छ राजकारण आहे.
अजय गुजरांनी माघार घेतली तरी हा संप सुरुच राहणार असल्याची भूमिका गुणरत्न सदावर्ते यांनी घेतली आहे. अजय गुजरांच्या नोटीसीनंतर इथे कुणीही आंदोलनात आलेलं नाहीये, त्यामुळे त्यांच्या एक्झिटमुळे कुणीही इथून जाणार नाही. हा दुखवटा मोडला जाऊ शकत नाही असे सदावर्ते यांनी बोलून दाखविले होते.