राज्यात एकीकडे महाविकास आघाडीचे सरकार स्थापना झालेले असताना दुसरीकडे स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये वाद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच आता राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थीर असून पुढील २५ वर्षे ही युती राहिल असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत सांगतात. मात्र दुसरीकडे या तिन्ही पक्षातील वाद आता समोर येत आहे
शिवसेना नेत्यांकडून सातत्याने स्थानिक पातळीवरील निवडणुकांच्या अनुभवाने महाविकास आघाडीतील नेत्यांना लक्ष्य करण्यात येते. यापूर्वी, शिवसेना नेते अनंत गिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख करत, आपण महाविकास आघाडीचा नसून फक्त शिवसैनिक असल्याचे म्हटले होते. आता, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई राष्ट्रवादीला इशारा दिला आहे.
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने आघाडी धर्म न पाळता इतरांशी हातमिळवणी केली. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुकांत शिवसेना ळावर लढणार असून, येथेही आघाडी धर्म पाळायचा का नाही, हे आता आम्ही ठरवू, असा इशाराच शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा महाविकास आघाडीत आलबेल नसल्याचं समोर आलं आहे. शंभूराजे देसाई यांनी आज शासकीय विश्रामगृहात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी, राज्य सरकारच्या 2 वर्षांतील कामाची माहिती देताना, राष्ट्रवादीला लक्ष्य केलं.