मुंबई | गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेलं एसटी कामगारांचं आंदोलन आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. ठाकरे सरकारनं दिलेली वेतनवाढ व इतर मागण्यांवर घेतलेली भूमिका स्वागतार्ह असल्याचं म्हणत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी केली. त्यानंतर, आमदार खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनातून तात्पुरती माघार घेतल्याचं जाहीर करत, आझाद मैदान सोडलं. त्यानंतर, आंदोलक कामगारांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलकांचं नेतृत्व करताना पडळकर व खोत यांच्यावर टीका केली आहे.
एसटी कामगारांनी उभारलेल्या लढ्याला मोठं यश आलं आहे. आता पुढील निर्णय कामगारांनी घ्यावा असं म्हणत खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आझाद मैदान सोडलं. त्यानंतर, गुणरत्न सदावर्ते यांनी भाषण करत, जोपर्यंत विलीगीकरण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल, असा पवित्रा जाहीर केला. राज्यातील २५० बस डेपोमधील कामगारांचे यास समर्थन असल्याचंही त्यांनी सांगित
लं. तसेच, पडळकर आणि खोत यांच्यावर टीका करताना, माझ्याकडे सदाभाऊ खोत हे माझ्या पाया पडल्याचा व्हिडिओ आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, आपण मराठा आरक्षणाविरुद्ध कोर्टात खटला लढवला, बाजू मांडली. मग, एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा का देता? असा प्रश्न सदावर्ते यांना विचारण्यात आला होता. त्यावरही, गुणरत्न यांनी स्पष्टीकरण दिलंय.
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुत्र आहे, मी लॉ विषयात डॉक्टरेट आहे. मी साहित्याचा अभ्यासक आहे, मी आंबेडकर विचारांचा एम.ए. मधील गोल्ड मेडलिस्ट आहे. त्यामुळे मी सर्वांना सांSo-I-one-Maratha-lakh-dieगतो की, एक मराठा लाख मराठा ही शक्ती देणारी घोषणा आहे असे त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते.