काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस सचिव प्रियंका गांधी यांनी यंदाची दिवाळी कन्याकुमारी येथील सेंट जोसेफ मॅट्रिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विझिटर्ससोबत साजरी केली. यावेळी राहुल गांधींना तुम्ही पंतप्रधान झालात तर सर्वात आधी कोणतं काम कराल?, असा प्रश्न विचारण्यात आला. तर क्षणाचाही विलंब न करता राहुल गांधी या प्रश्नाचं उत्तर दिलं.
राहुल गांधींनी त्यांच्या दिवाळी सेलिब्रेशनचा व्हिडीओ त्यांच्या ट्विटरवर शेअर केला. त्यांच्या संभाषणादरम्यान एकाने त्यांना विचारलं की, तुम्ही पंतप्रधान झालात तर सर्वात आधी कोणतं काम कराल तर यावर मी पंतप्रधान झालो तर सर्वात आधी महिलांना आरक्षण देईल, असं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे. जर कोणी मला विचारलं की तुम्ही तुमच्या मुलांना काय शिकवण द्याल तर मी विनम्रता शिकवेन. कारण विनम्रता ही एक अशी गोष्ट आहे की ज्यामुळे तुम्हाला समज यायला मदत होते. राहुल गांधींनी त्यांच्या दिवाळी जेवणाच्या वेळेचे काही क्षण ट्विट करत शेअर केले आहेत.
मित्रांच्या या भेटीने दिवाळी आणखीनच खास झाली, असं लिहित राहुल गांधींनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. तर राहुल गांधीनीं पुढे लिहिलं की, संस्कृतींचा हा संगमच आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आहे आणि आपण ती जपली पाहिजे. तर या दिवाळी कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या शेतकरी आंदोलनातील सहभागाचं देखील कौतुक झालं.