मुंबई | | १०० कोटींच्या वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना रात्री ईडीने तब्बल १२ तास चौकशी केल्यानंतर अटक केली आहे. त्यानंतर राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा गरम झालं असून भाजप आमदार नितेश राणे यांनी देशमुखांच्या अटकेनंतर परिवहन मंत्री अनिल परब यांना इशारा दिला आहे.
अनिल देशमुख यांना हॅप्पी दिवाळी, तर अनिल परब याना मेरी ख्रिसमस… नवाब मलिक आणि संजय राऊत… धन्यवाद…. अस खोचक ट्विट करत नितेश राणे यांनी इशारा दिला आहे. तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील अनिल परब यांना इशारा दिला आहे.शंभर कोटींपेक्षा जास्त रकमेची वसुली, गैरव्यवहार आणि मनी लाँडरिंग प्रकरणात अखेर अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे.
तसेच अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर लागणार आहे असे किरीट सोमय्या यांनी म्हंटल. दरमहा १०० कोटींची जी वसुली येत होती त्यातील पवार यांच्याकडे किती पैसे पोहचते व्हायचे आणि ठाकरेंकडे किती जायचे, याचे उत्तर आता द्यावे लागणार आहे, असे सोमय्या यांनी म्हटले आहे. आता या टीकेला मनोविकास आघाडी काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.