सांगली येथील कार्यक्रमात बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट रास्तवराडीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करत एकच खळबळ उडवून दिली होती. त्यातच या टिकेवरून राष्ट्रवादी तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटलांचा चांगलाच समाचार घेतला होता. . त्याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.
पुण्यातील आयोजित एका सत्कार समारंभात चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला होता. तसेच त्यांनी या संबंधी आता स्पष्टीकरण देत सारवासारवही केली होती. पण यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठल्याचं पाहायला मिळत आहे.
‘सत्ता गेल्यानंतर कुणाचा तोल जातो तर, कुणी भ्रमिष्ट होतं, यापैकी चंद्रकांत पाटलांचं नेमकं काय झालंय?, याचं संशोधन करावं लागेल’, अशी अशी टीका जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांवर केली आहे. तसेच चंद्रकांत पाटलांनी आपण कायमच शरद पवारांचा आदर करत आलो आहोत, असं स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं की, आपण शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आलो, त्यामुळे खासगी कार्यक्रमात त्यांनी मोदींचा एकेरी उल्लेख केला असावा, असा टोलाही त्यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. आता या टीकेला भाजपा काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.