. ‘शेतकरी आंदोलन करीत असताना केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने भरधाव गाडी शेतकऱ्यांच्या आंदोलनात घुसवून शेतकऱ्यांना ठार केले. त्यामुळे आंदोलक भडकले व हिंसाचार झाला. संतत्प शेतकऱ्यांनी अनेक गाड्यांची जाळपोळ केली. यादरम्यान झालेल्या हिंसाचारात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर रात्री उशीरा या ठिकाणी पहाणीसाठी आणि पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी पोहचलेल्या काँग्रेसच्या महसचिव प्रियंका गांधी यांना मध्य रात्रीनंतर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा काँग्रेस नेत्याने केलाय. युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बि. व्ही. यांनी, ‘प्रियंका गांधी वढेरा यांना हरगावमधून अटक करण्यात आलीय,’ असा दावा आपल्या ट्विटमध्ये केलाय.
यानंतर गेल्या ३६ तासांपासून नजरकैदेत असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रियांका गांधींनी कलम -१४४ चे उल्लंघन आणि शांतता भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. आधी नजरकैदेत ठेवलेल्या प्रियांकांवर युपी पोलिसांनी ३६ तासांनी कारवाई केली आहे. प्रियांका गांधींना काहीच वेळात कोर्टात दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाऊ शकते.
दरम्यान, पीडितांची करण्यासाठी गेलेल्या प्रियांका गांधी यांना अटक केली, मात्र शेतकऱ्यांना चिरडणारे भाजप नेते मोकळे आहेत. भाजपने क्रूरपणाची सीमा पार केली आहे. तसेच ४५ लाख देऊन शेतकऱ्यांचा आवाज विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व प्रकारावर पंतप्रधान मोदी गप्प का?, असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. क्रूरपणाची परिसीमा पार करणाऱ्या भाजपचा हा माज जनतेनंच उतरवला पाहीजे, असंही सावंत यावेळी म्हणाले आहेत.