उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचारात केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चढवली. या घटनेत ६ शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आशिष मिश्रा याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकरी नेत्यांनी केली . त्यानंतर पोलिसांनी आशिष मिश्रा याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यावर आता केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी जाहीर आव्हान केलं आहे.
लखीमपूर खीरी येथे अजय मिश्रा यांच्या मालकीच्या कारने शेतकऱ्यांना धडक दिली. त्यामध्ये एक गाडी अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा हा चालवत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला असला तरी यावर मिश्रा यांनी स्पष्टीकरण दिले आहे. लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचारासंबंधित माझा मुलगा आशिष मिश्रा याच्याविरोधात कोणतेही पुरावे समोर आले तर मी राज्यमंत्रीपदाचा देईल, असं अजय मिश्रा यांनी सांगितलं आहे.
लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यृ झाला आहे. अजय मिश्रा यांनी असा दावा केला आहे, त्यांचा मुलगा आशिष मिश्रा हा हिंसाचार घडून आला तेव्हा तो दुसऱ्या कार्यक्रमाला उपस्थित होता. त्या कार्यक्रमाचे व्हिडीओ आणि फोटो पुरावे देखील आहेत. परंतु शेतकरी संघटनांनी असं म्हटलं आहे की मंत्र्यांच्याच मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली आहे. या घटनेची पुढील चौकशी आता पोलीस करत आहेत.