सध्या नदी ओढ प्रकल्पाची जोरदार चर्चा होत असून या प्रकल्पावर आता प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गुजरात सरकारवर घणाघाती टीका केली आहे. नदीजोड प्रकल्पांबाबत आम्ही चर्चा करत आहोत. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये एमओयू होणे गरजेचे आहे. मात्र गुजरात सरकार त्यांचा लाभ आधिक होईल अशाच अटी-शर्ती टाकत आहे. त्यामुळे एमओयू होत नाही. म्हणूनच या प्रकल्पाचे काम सध्या फारसे होत नसल्याची माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रविवारी औरंगाबादेत दिली.
पाटील म्हणाले, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री कराड यांनी या कामासाठी ४० हजार कोटी रुपये लागणार असून राज्याने प्रस्ताव द्यावा, असे आढावा बैठकीत सांगितले होते. याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, गुजरातमध्ये भाजपचे सरकार आहे तसेच केंद्रातही त्यांचेच सरकार आहे. त्यामुळे ते आता केंद्रात मंत्री असल्यामुळेच त्यांनीच याबाबत पुढाकार घ्यावा. त्यामुळे यामध्ये आणखी गती येण्यास मदत होईल आणि महाराष्ट्राचा फायदा होईल.
तसीच नदीजोड कार्यालय औरंगाबादला हलवण्याबाबत कुठलीही चर्चा नसल्याचे ते म्हणाले. नांदेडहून वाहून जाणाऱ्या पाण्याबाबत तेलंगणा प्रतिसाद देत नाही. मात्र, त्यांना आमचा भेटण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. आता यावर सत्तेत असलेले आणि महाराष्ट्रात विरोधात बसलेले भाजप काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे