हसन मुश्रीफ यांनी प्रदेशाद्यक्ष चंद्रकांत पाटलांवर केलेल्या विधानानंतर पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषेद घेऊन सेना आणि राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसचे दोन मंत्री आमच्या रडारवर आहेत असे विधान केले होते. आता या विधवेर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. यावरी त्यांनी तत्कालीन फडणवीस यांच्या काळातील घोटाळे बाहेर काढण्याची धमकी दिली होती. आम्हाला घाबरण्याची गरज नाही. पण आम्ही मात्र आता फडणवीसांच्या काळातील फाईल्स बाहेर काढणार असल्याचा इशाराच नाना पटोले यांनी दिला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबावर १२७ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला. त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिद घेऊन घोटाळ्याचे आरोप फेटाळले. उलट चंद्रकांतदादांकडून मला भाजप प्रवेशाची ऑफर होती पण मी ती नाकारल्याने माझ्यावर ईडीच्या धाडी टाकल्या गेल्या, असा गौप्यस्फोट मुश्रीफांनी केला.
मुश्रीफांच्या प्रेसनंतर चंद्रकांतदादांनी पत्रकार परिषद घेतली. मुश्रीफांचा दावा खोडून काढताना कायदेशीर लढाईला तयार रहा, असा इशार दिला. तर फक्त आमच्या रडारवर फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीच आहे, असं नाहीय. तर येत्या काही काळात 2 काँग्रेस नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार, अशी धमकी त्यांनी काँग्रेसला दिली होती. यानंतर पटोले यांनी थेट फडणीसांच्या काळातील घोटाळे बाहेर काढणार असल्याचे सूचक विधान केले होते.