बीड | गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या करुणा धनंजय मुंडे यांच्या जामिनावर मंगळवारी न्यायालयात सुनावणी होणार असून या सुनवाईकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अंबाजोगाईच्या जिल्हा सत्र न्यायालयात ही सुनावणी होईल. यावेळी न्यायालय करुणा शर्मा यांना जामीन देणार किंवा नाही, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
करुणा शर्मा बीडमध्ये असताना त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आले होते. यानंतर पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या वाहन चालकाला ताब्यात घेतले होते. ६ सप्टेंबरला पोलिसांनी करुण मुंडे यांना न्यायालयात हजर केले होते. तेव्हा न्यायालयाने करुणा शर्मा यांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. तसेच त्यांच्या ड्रायव्हरला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
करुणा मुंडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपण बीड येथे येणार असून धनंजय मुंडे यांचा भांडाफोड करणार असल्याचे विधान केले होते. तसेच त्यांनी परळीत प्रवेश करताना त्यांच्या गाडीची झडती घेतला करुणा मुंडे यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आलं होतं. त्यामुळे त्यांच्यासह चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच करुणा मुंडे यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यता आलं.