पिंपरी-चिंचवड : सध्या राज्यात भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्के मिळताना दिसत आहे. तर कुठे-कुठे भाजपने नेते स्वपक्षावर गंभीर आरोप लावत आहे. काल जळगाव महानगर पालिका निवडणुकीत भाजपा नगरसेवकांनी थेट सेनेच्या तंबूत प्रवेश करत भाजपाला जोरदार धक्का दिला होता.
आता पुन्हा एकदा भाजप नगरसेवकाने शहरात लावलेला बॅनर शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत आहे. रवी लांडगे असे नाराज नगरसेवकाचे नाव असून त्यांच्या समर्थकांनी पिंपरी-चिंचवड शहरात पोस्टरबाजी केली आहे. यासंदर्भात त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा नंबर कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असल्याचे समोर आले.
रवी लांडगे हे भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून मागच्या ४० वर्षांपासून ते भारतीय जनता पक्षाचे काम करत आहे. तसेच पक्ष वाढवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. चार वर्षे झालं ते नगरसेवक असून त्यांना महानगर पालिकेतील महत्वाचे पद देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, नुकतीच झालेली स्थायी समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यांचा पत्ता कट करण्यात आला. त्यामुळे ते अधिकच नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
याप्रकरणी त्यांच्या समर्थकांनी पिंपरी-चिंचवड शहरात 40 वर्षांपासून आमचं कुटुंब भारतीय जनता पक्षाची सेवा करतंय हे आमचं चुकलं का? सोयीचं राजकारण नाही तर स्वाभिमानी राजकारण अंगीकृत केलं हे माझं चुकलं का? आ प्रश्न उपस्थित करत उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे.